Mumbai Crime : परपुरुषाशी प्रेमसंबंधाचा संशय : पतीकडून पत्नीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime : परपुरुषाशी प्रेमसंबंधाचा संशय : पतीकडून पत्नीची हत्या

मुंबई : पर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पत्नीची पतीने हत्या केल्याची घटना मुंबईच्या भांडुप परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करण्यात आल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. 37 वर्षीय बसंत साहा असे अटक आरोपीचे नाव आहे.

बसंत साहा या आरोपी पतीने कथितपणे आपली पत्नी 21 वर्षीय रीटा देवी हिच्या डोक्यावर स्वयंपाक घरात असलेल्या तव्याने डोक्यात वार करून तिची हत्या केली.आरोपी पती आणि त्याची पत्नी दोघेही भांडुप येथील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या घरात राहत होते. महापालिकेच्या भांडुप येथील शौचालय व्यवस्थापनाचे पती पत्नी काम करत होते. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.