Mumbai Crime : पत्नीला पेटवून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; दोघांचीही प्रकृती चिंतानजक

फाइल फोटो
फाइल फोटोesakal

मुंबई : धारावी परिसरात घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फाइल फोटो
Mumbai Water Supply : कल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीकपात

याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धारावी येथील नाईकनगर येथील अशोक गल्लीत हा प्रकार घडला. तेथे प्रिया धुरिया व अनिल धुरिया दाम्पत्य राहत होते.

बुधवारी रात्री दोघांमध्येही भांडण झाले. त्या वेळी अनिल मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने घरातील रॉकेल प्रियाच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले व आग लावली.

फाइल फोटो
Mumbai : पोक्सो कायदा लैंगिक शोषण रोखण्यासाठी, पण संबंध सहमतीने...; HCचे निरीक्षण

या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना तत्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करून अनिलविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत प्रिया १०० टक्के, तर अनिल ९० टक्के भाजल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com