esakal | ICU मध्येच महिला रुग्णावर अत्याचार; विनयभंगाच्या गुन्ह्याखाली वॉर्डबॉयला अटक

बोलून बातमी शोधा

ICU मध्येच महिला रुग्णावर अत्याचार; विनयभंगाच्या गुन्ह्याखाली वॉर्डबॉयला अटक}

अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर वॉर्डबॉयने अत्याचार केल्याची गंभीर घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे.

ICU मध्येच महिला रुग्णावर अत्याचार; विनयभंगाच्या गुन्ह्याखाली वॉर्डबॉयला अटक
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई,  : अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर वॉर्डबॉयने अत्याचार केल्याची गंभीर घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयला अटक केली आहे. 

पीडित महिला कतार देशातून आली आहे. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे बहिणीने तिला घाटकोपर पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. महिला बेशुद्ध असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यावेळी वॉर्डबॉय राकेश सुरेश राठोड (वय 27) याने तिच्यासोबत अश्‍लील वर्तन केले. हा प्रकार तिच्या 37 वर्षीय बहिणीला कळाल्यानंतर तिने घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भादंवि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वॉर्डबॉय राठोडला अटक केल्याची माहिती पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली. राठोड हा घाटकोपर येथील रहिवासी आहे.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने अद्याप वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली नाही. पण प्राथमिक तपासात आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai crime marathi abuse with female in ICU Wardboy arrested molestation latest