Mumbai Crime : 14 किलो सोनं, 2 कोटी रोख रकमेसह पाच जण ताब्यात; DRI ची मोठी कारवाई

DRI Action Mumbai : दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विक्री करणाऱ्या टोळीच्या पाच जणांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. डीआरआयने झवेरी बाजार, वर्सोवा व मुंबादेवी परिसरात छापे टाकून कारवाई केली.
Mumbai Crime
Mumbai Crimeesakal

DRI Action Mumbai : दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विक्री करणाऱ्या टोळीच्या पाच जणांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. डीआरआयने झवेरी बाजार, वर्सोवा व मुंबादेवी परिसरात छापे टाकून कारवाई करत मोहम्मद रफीक रझवी, महेंद्र जैन व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला, उमेद सिंह व महिपाल व्यास आदींना अटक केली.

तसेच आरोपींकडून १४ किलो ४०७ ग्रॅम सोने, दोन कोटी रुपयांची रोख व ४६०० पाऊंड ब्रिटिश चलन जप्त केले आहे. सोने तस्कर टोळी दोन ते तीन हजार रुपये प्रतिकिलो कमिशनवर तस्करी करून भारतात आणलेल्या सोन्याची कमी दरात विक्री करायचे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ८.२५ कोटी रुपये आहे.

Mumbai Crime
Dearness Allowance : निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट! DA मध्ये चार टक्क्यांची वाढ

या प्रकरणात सहभागी एका महिलेसह दुबईतील मुख्य आरोपीची माहितीही तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार समीर मर्चंट हा सोन्याच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती ‘डीआरआय’ला मिळाली होती. भारतीय बाजारात वितरण करण्यासाठी हे सोने रफिक रझवीला पाठवण्यात यायचे.

सोन्याची विक्री माझगाव येथील दलाल महेंद्र जैन याच्यामार्फत केली जायची. त्याबाबत डीआरआयचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून तपास करत होते. झवेरी बाजारातील दोन ठिकाणांवरून हा व्यवहार चालतो, असे डीआरआयला समजले. त्यानुसार डीआरआयने विठ्ठलवाडी रोडवरील दुकानात छापा टाकला.

Mumbai Crime
IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav : कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय

या कारवाईत १० किलो सोने सापडले. जप्त केलेले सोने दुबईतील अमजद नावाची व्यक्ती भारतात पाठवत होती. त्यानंतर समीर मर्चंट व त्याची पत्नी ज्योती किट्टी हे सोने टोळीतील इतर सदस्यांना विक्रीसाठी देत होता. मर्चंटला यापूर्वी १९९७ मध्ये ‘डीआरआय’ने हाँगकाँगवरून परदेशी चलन आणल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्याला अहमदाबाद ‘एनसीबी’ने अटक केली होती. २०१३ मध्ये समीर मर्चंट तुरुंगाबाहेर आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com