Mumbai Crime News
Mumbai Crime News

Mumbai Crime News : वसतीगृह हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट; आता वॉर्डनची चौकशी...

मुंबई : मुंबईतील वसतिगृह हत्याकांड प्रकरणात नवीन नवीन माहिती उघड होत आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी या घटने संदर्भात वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. वसतीगृहातील वॉर्डन संदर्भातही त्यांनी आपले आक्षेप नोंदवले होते. या सर्व प्रकारच्या तपासात वसतिगृहातील वॉर्डनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती.

Mumbai Crime News
Mumbai News : पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक! हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून येत्या काही दिवसात पोलीस वस्तीगृहाच्या वॉर्डनची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांचे जबाब नोंदवलेले आहेत या जबाबात मृत विद्यार्थिनी सोबत राहणाऱ्या काही तरुणींनी आरोपी यापूर्वी सुद्धा मृत तरुणीला त्रास देत असल्याचे सांगितले परिणामी या विषयी माहिती वसतिगृहातील वॉर्डनला देण्यात आली होती का या दृष्टिकोनाने पोलीस तपास करणार आहेत.

वॉर्डनची चौकशी

मृत मुलीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहातील वॉर्डन संदर्भातही त्यांनी आपले आक्षेप नोंदवले होते. या सर्व प्रकारच्या तपासात वसतिगृहातील वॉर्डनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती. आता याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात काही दिवसात पोलीस वस्तीगृहाच्या वॉर्डनची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पीडितेच्या 53 वर्षीय वडिलांनी वसतिगृह प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले होते.वसतिगृहात तीन रक्षक होते, सर्व पुरुष होते.मुलींच्या वसतिगृहात महिला रक्षक का नाहीत, असा सवाल वडिलांनी केला.तसेच वसतिगृह अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.

मृत मुलीच्या वडिलांच्या मते त्याच्या मुलीने वॉर्डनला खालच्या मजल्यावर असलेल्या खोलीत हलवण्यास सांगितले होते, परंतु तिला एकतर तिच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत राहा किंवा वसतिगृह सोडण्याचे उत्तर वसतिगृह प्रशासनाने दिल्याचे पीडितेचे वडील सांगतात.

Mumbai Crime News
Sharad Pawar Threat : "बावनकुळे म्हणतात आमच्या रक्तात नाही, पण त्यांच्यासोबतच पवारांना धमकी देणाऱ्याचा फोटो!"

मैत्रिणीचा खुलासा

मृत तरुणी सोबत वसतिगृहात राहणारी तिच्या मैत्रिणीने सकाळशी बोलताना अनेक खुलासे केले. आरोपी 33 वर्षीय ओमप्रकाश कनोजिया याने गेल्या महिन्यात पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने केला आहे. तसेच आरोपी वारंवार तिच्याशी जवळीक साधण्याचा जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. पिडीत मुलीच्या मैत्रिणीने वसतिगृह अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार न केल्याबद्दल खंत व्यक्त केली.

मे महिन्यात सुरक्षा रक्षकाने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे वॉर्डनला सांगावे असा मृत मुलीकडे मैत्रिणीने आग्रह धरला होता. परंतु तिने नकार दिला, कारण ती लवकरच घरी जाण्याच्या योजनेत असल्यामुळे तिला हे प्रकरण वाढवायचे नसल्याचे मैत्रिणीने सांगितले.

पोस्टमोर्टम अहवालात काय

पोलिसाना गुरुवारी मृत मुलीचा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाला आहे.यात डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबद्दल कोणतीही विशिष्ट टिप्पणी केलेली नाही. अहवालानुसार मृत मुलीच्या गुप्तांगामध्ये कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे प्राथमिक डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबाबत अहवालात कोणतीही विशिष्ट टिप्पणी केलेली नाही. मृत महिलेचा स्वॅबचा अहवाल येणे बाकी असल्यामुळे लैंगिक अत्याचारांविषयी पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com