esakal | संशय आल्याने मुलगा खाली आला, आईचे हातपाय बांधून ठेवलेले पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली

बोलून बातमी शोधा

संशय आल्याने मुलगा खाली आला, आईचे हातपाय बांधून ठेवलेले पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली }

वरळी सीफेसवरील बंगल्यात राहणाऱ्या 77 वर्षीय वृध्द महिलेची हत्या  केल्याप्रकरणी नोकरासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात वरळी पोलिसांना यश आले आहे.

mumbai
संशय आल्याने मुलगा खाली आला, आईचे हातपाय बांधून ठेवलेले पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता.01ः वरळी सीफेसवरील बंगल्यात राहणाऱ्या 77 वर्षीय वृध्द महिलेची हत्या  केल्याप्रकरणी नोकरासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात वरळी पोलिसांना यश आले आहे. विषणी डोलवानी असे या महिलेचे नाव असून गुरुवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 तासांत हा हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे

महत्त्वाची बातमी : वैधानिक मंडळे घोषित करण्याबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; फडणवीस म्हणतात, "दादांच्या पोटातले ओठांवर आले"

वरळी सी फेस येथील प्रसन्न कुटीर या तीन मजली बंगल्यात पती, मुलगा, सुन यांच्यासोबत विषणी डोलवानी राहत होत्या. गुरुवारी रात्री विषणी या तळ मजल्यावर टीव्ही पाहत बसल्या होत्या. तर पहिल्या मजल्यावर त्याचा मुलगा झोपण्यासाठी गेला होता. बंगल्यातील सुरक्षारक्षकाने मध्यरात्री विषणी यांच्या मुलाला फोन केला. घरात कामाला असलेला नोकर अद्याप आलेला नसल्याचे त्याने सांगितले. काहीतरी काळंबेर असल्याचा संशय आल्याने विषणी यांचा मुलगा खाली आला असता आईचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवल्याचे त्याने पाहिले.

मोठी बातमी : APMC मार्केटमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा, चौकशीसाठी सरकारची टाळाटाळ

याबाबत त्याने पोलिसांना कळविले. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विषणी यांना जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरातील पाच लाखांचे दागिनेही गायब होते. यावेळी दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे कामाला लागलेला 22 वर्षीय नोकर अमरजीत कमरराज निशाद हा बेपत्ता होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार 22 वर्षीय अभिजीत रामपलट जोरीया याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यांत चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमाल जप्त करण्यात वरळी पोलिसांना यश आले आहे.

mumbai crime news mumbai police solved case within 48 hours of crime incident