Mumbai : वकिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धक्का; आता वाहतूक पोलिसांत...

Police
Police esakal

मुंबई : वकिलांना मारहाण प्रकरणी आरोप असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांची वाहतूक पोलीस विभगात बदली करण्यात आली आहे.

नासिर कुलकर्णीआणि इतर पोलिस कर्मचार्‍यांवर स्टेशनच्या आवारात दोन वकिलांना मारहाण केल्याप्रकरणी प्रशासनामार्फत विभागीय चौकशी सुरू केली होती. परंतु कुलकर्णी यांची शहर वाहतूक विभागात बदली करण्यात आली.

शनिवारी बदलीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.ताडदेव पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक मनोज हेगस्ते यांची अँटॉप हिल स्थानकात कुलकर्णी यांच्या जागी नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. साधंना यादव या महिला वकिलांने गुरुवारी रात्री मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून कथित हल्ल्याच्या घटनेची माहिती दिली

Police
Mumbai News : आधीच गर्मी, त्यात अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकांतील सरकते जिने बंद!

घटना थोडक्यात

साधना यादव यांचे सहकारी वकील ऋषीकेश शर्मा यांचे वडाळा (पूर्व) येथे कार्यालय आहे. गेले अनेक वर्षे तेथून वकिलीचा व्यवसाय करत आहे. काही महिन्यांपासून तेथे 2 स्थानिक सतत या वकिलांना त्रास देत होते. शेवटी उपद्रवाला कंटाळून त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार दाखल केली. साधना यादवने नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्यानंतर अँटॉप हिल पोलिस स्टेशनचे एक पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोन कथित आरोपींना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.त्यासोबतच साधना यादव आणि हृषिकेश शर्मा हे सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचले.

Police
2000 Note : दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत, साई संस्थानकडून आवाहन; 'एवढ्या' नोटा आहेत पडून

मारहाणीचा आरोप

पिडीत वकिलांनी त्यांच्या तक्रारी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीस अधिकारी तक्रार नोंदवून घेण्यास तयार नव्हते. “त्यानंतर त्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या केबिनमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यात वाद झाला वादानंतर काही महिला कॉन्स्टेबलने साधना यादवला केबिनच्या बाहेर खेचले आणि शेजारच्या खोलीत ओढून नेले. तसेच साधना यादवला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनीही त्यांना मारहाण केल्याचा आरोप वकील साधना यादवने केला आहे. या मारहाणीत साधना यादवचा पाय फ्रॅक्चर झाल्याने यादव यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,”

"आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि घटनेची वस्तुस्थिती पडताळत आहोत. पुरावे आणि तथ्याच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल"

- प्रवीण मुंडे,पोलीस उपायुक्त, मुंबई पोलीस

Police
Akola Riots : अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी अटकेत

"वकिलांची संघटना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल ची कमिटी फक्त नवीन वकिलांकडून 15000 घेणे आणि सरकारी मंत्र्यांसोबत स्वतःचे संबंध सांभाळणे इतकेच काम करते आहे, वकिलांना न्याय देण्यासाठी स्वतः काहीही करत नाही त्यामुळे ही कमिटी बरखास्त करावी असे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ह्यांना निवेदन करणार आहोत."

-ॲड धनंजय जुन्नरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com