मुंबईच्या पोलिसांची शानदार कामगिरी! वर्षभरात 11 हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

अनिश पाटील
Sunday, 24 January 2021

लॉकडाऊन काळात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या विशेष प्रतिबंधात्मक मोहिमेंतर्गत वर्षभरात 11 हजार 500 सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.

मुंबई  ः लॉकडाऊन काळात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या विशेष प्रतिबंधात्मक मोहिमेंतर्गत वर्षभरात 11 हजार 500 सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. त्यासाठी फरारी आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली होती. तसेच 25 कुख्यात आरोपींची यादी तयार करून एक पोलिस एक गुन्हेगार अशी मोहीम राबवण्यात आली. याशिवाय दोन वेळा ऑपरेशन ऑलआऊटही राबवण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने दिले होते. 

प्रतिबंधात्मक कारवाइअंतर्गत सीआरपीसी कलम 107 अंतर्गत आठ हजार 549 आणि कलम 110 अंतर्गत 3045 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. त्यात 110 कलमांतर्गत हमीपत्र लिहून घेतलेल्या 46 गुन्हेगारांकडून त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाच जणांना अटक करण्यात आली; तर 107 अंतर्गत उल्लंघन करण्यात आलेल्या 43 जणांनी हमी पत्रातील अटींचे उल्लंघन केले. याप्रकरणी सात जणांना अटकही करण्यात आली होती. 
वॉन्टेड आरोपींबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर 25 सराईत आरोपींची यादी तयार करण्यात आली. एक पोलिस एक गुन्हेगार या योजनेअंतर्गत या गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

टोळीचे म्होरके, सराईत सायबर गुन्हेगार, आर्थिक गुन्हेगार, जबरी चोरी, मारहाण इ. गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपींसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. फरारी आरोपींच्या यादीची अनेक वर्षांपासून पडताळणी झालेली नाही. त्यामुळे या यादीची नव्याने पाहणी करून नवी यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

कार्यपद्धती अशी 
पोलिस ठाण्यांच्या पातळीवर 25 सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येणार आहे. "एक पोलिस, एक गुन्हेगार' या योजनेमार्फत या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा आरोपींकडून हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी पाच-दहा हजार रुपयांच्या हमीपत्र भरले जायचे, त्याची रक्कम वाढवून 10 ते 15 लाखांचे हमीपत्र भरून घेण्यात येत आहे. तसेच यातील जे गुन्हेगार गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात येऊन चांगले जीवन जगण्याच्या प्रयत्नात आहेत, अशांचे पुनर्वसन करण्यासही पोलिस मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 
संख्याबळाचे वाटपही पोलिस ठाणेपातळीवर सरसकट न करता दाखल गुन्हे, विभागाची रचना, लोकसंख्या आदी लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहारांप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्यांची उकल करण्याची कामे वाटून देण्यात येणार आहेत. 

mumbai crime Preventive action against 11,000 criminals during the year by mumbai police

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai crime Preventive action against 11,000 criminals during the year by mumbai police