Mumbai Crime : अनेक वर्षांपासून सोन्याचा व्यापार करणाऱ्या सराफानेच घातला ग्राहकांना गंडा; आता...

Mumbai Crime
Mumbai Crime

डोंबिवली - ठाकुर्ली येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचा मालक अचानक दुकान बंद करून गायब झाला होता. 16 गुंतवणूक दारांकडून त्याने सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्ज देतो असे सांगत त्यांची तब्बल 31 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केली होती.

Mumbai Crime
Vedant Waghmare : आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी वेदांत वाघमारेची संघात निवड

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मागील वर्षी सराफ सोहनसिंह चैनसिंह दसाना (वय 52) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सराफ दसाना हा आपल्या गावी राजस्थान येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी राजस्थान येथे जाऊन दसाना याला अटक केली आहे.

ठाकुर्ली येथे दसाना यांचे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून तो सोने-चांदी दागिन्यांचा व्यापारी म्हणून व्यवसाय करत होता. परिसरातील ग्राहकांचा त्याने विश्वास संपादन करत भिशी, कर्ज यांसारख्या योजना तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून राबवित होता. जून 2108 ते जून 2022 या कालावधीत सराफ दसाना याने ठाकुर्लीत राहणाऱ्या मिनु प्रमोद गांधी (वय 53) यांच्यासह इतर 15 ग्राहकांचा विश्वास संपादन केला.

या ग्राहकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्जाऊ रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोन्याचे दागिने बनविण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. अशाप्रकारे 31 लाख 53 हजाराची रक्कम जमा झाल्यानंतर सोहनसिंह याने ग्राहकांना त्यांनी जमा केलेल्या सोन्याच्या रकमेवर कर्जाऊ रक्कम न देता, त्यांना सोन्याचे दागिने बनवून न देता दुकानाला टाळे लावून तो फरार झाला.

Mumbai Crime
Ajit Pawar : आपणही अजमेरला चादर चढवायला जातो ; त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन अजित पवार संतापले

तो जुना व्यापारी असल्याने फसवणार नाही असा विश्वास ग्राहकांना होता. त्यामुळे त्यांनी काही दिवस दुकान सुरू होण्याची वाट पाहिली, फोनवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याची खात्री तक्रारदार मिनू यांना झाली. मिनू यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात सोहनसिंह विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, पी. के. पाटील, एल. पी. निसार, एस. पी. पिंजारी या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे पोलिसांना सोहनसिंह राजस्थान जिल्ह्यातील गटबोर तालुक्यातील थुरावड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राजस्थान येथे सोहनसिंह राहत असलेल्या भागात तळ ठोकला. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. या अटकेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com