स्वतःच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या बापासह पाच जणांना खर्डीत अटक

kidnapping
kidnappingsakal media

खर्डी : स्वतःच्या मुलाचेच अपहरण (child kidnapping) करणाऱ्या बापासह पाच जणांना येथील पोलिसांनी अटक (culprit arrested) केली. मुलीने तलाक दिलेला जावई मानसिक, शारीरिक छळ करतो म्हणून हैदराबाद येथील शाहिद सिद्दकी आपल्या मुलीसह कुटुंबीयांसोबत खर्डी (khardi) येथे राहायला आले होते. त्यांच्या मागावर असलेल्या जावयाने माग काढून खर्डी गाठली व आपल्याच मुलाचे फाऊंटन हॉटेलच्या प्रांगणातून अपहरण करून कारने पळ काढला. स्थानिक व पोलिसांनी वेळीच पाठलाग करून मुलाची सुटका केली. याप्रकरणी खर्डी पोलीस (Khardi police) दूरक्षेत्रात बापाने मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली.

kidnapping
रायगड : पेणमध्ये दारूसाठा जप्त

हैदराबाद येथे राहणारी उस्मा शाहिद सिद्दकी (वय ३४, सध्या रा. खर्डी-शहापूर) हिचे पाच वर्षांपूर्वी महंमद इम्रान नजीर खान याच्याशी २०१६ मध्ये हैदराबाद येथे लग्न झाले होते. उस्मा ही गरोदर असताना २०१७ मध्ये महमंद इम्रान याच्याशी तलाक झाला. त्यांना मुलगा झाला होता; परंतु पती महंमद इम्रान हा पत्नी उस्माला मुलाला ताब्यात घेण्यासाठी अश्लील भाषेत धमकी देणे, पत्नीचे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करणे व पत्नीच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी प्रकार वारंवार करीत असल्याने उस्माच्या वडिलांनी हैदराबादवरून कुटुंबीयांना शहापूर तालुक्यातील खर्डी येथे गेल्या सात दिवसांपासून वास्तव्यास आणले होते.

१४ सप्टेंबरला दुपारी १ ते १.३० दरम्यान खर्डी येथील हॉटेल फाऊंटनसमोर उस्मा व महंमद इम्रान यांचा चार वर्षीय मुलगा जियान खेळत असताना तिथे कारमधून एकाने उतरून जियान याला उचलून पळ काढला. या वेळी स्थानिकांनी पोलिसांना कळवून त्या गाडीचा पाठलाग केला. पोलिस अधिकारी रोहिदास केंद्रे यांनी कसारा पोलिसांना सूचना देऊन गाडी पकडण्यास मदत करण्यास सांगितले. कसाऱ्याजवळील वाशाळा रोडवर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने खर्डी पोलिसांनी त्या गाडीतील पाच जणांना ताब्यात घेऊन चार वर्षीय जियानला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. या प्रकरणी खर्डी पोलिसांनी महंमद इम्रान नजीर खान, अब्दुल खदीर रहीम सय्यद, महंमद अब्बास, आरिफ निरंजन सय्यद व महंमद समशेद अब्दुल खान या पाच जणांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com