esakal | मुंबई : फ्लॅटच्या प्रलोभनाने फसवणाऱ्यास अटक | Crime update
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई : फ्लॅटच्या प्रलोभनाने फसवणाऱ्यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : एसआरएच्या फ्लॅटचे प्रलोभन (Flat decoy) दाखवून फसवणूक करणाऱ्या एका वॉण्टेड आरोपीस अंधेरी पोलिसांनी (andheri police) अटक केली. कौशल महेंद्र शाह असे या ४३ वर्षीय आरोपीचे नाव (culprit arrested) असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने (andheri court) पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. यापूर्वी या गुन्ह्यांत पोलिसांनी तिघांना अटक केली असून कौशल हा चौथा आरोपी आहे.

हेही वाचा: एमएचटी सीईटीला ९७ हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

या टोळीने आतापर्यंत दहा ते बारा जणांची एक कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार सोपान कालिदास कदम हे अंधेरीतील सहार रोड, कोलडोंगरी परिसरात राहत असून ते एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गीता लांडगे, नितेश लोटणकर, दिलीप शेठ, कौशल शाह व इतर आरोपींविरुद्ध फसवुणकीचा गुन्हा नोंदविला होता.

loading image
go to top