मुंबई : बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

Culprit Arrested
Culprit Arrestedsakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या बोरिवली परिसरात बेकायदेशिर पिस्तूल (illegal gun selling) बाळगणाऱ्याला 20 वर्षांच्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखा युनिट 11 नं अटक केली आहे. विनापरवाना शस्रास्र बाळगल्या प्रकरणी (without license Arms) सरकारतर्फे फिर्याद घेऊन त्याच़्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3, 25 तसंच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 31(1) (अ), 135 अंतर्गत गुन्हा दाखल (police FIR) करुन त्याला अटक (Culprit arrested) करण्यात आली आहे.

Culprit Arrested
कोरोनाच्या लाटांची बालकांनाही बाधा; पहिल्या लाटेत १९८८, दुसऱ्या लाटेत...

गुन्हे शाखा युनिट 11 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती रिक्षामधून त्याच्याजवळ असलेले बेकायदेशिर पिस्तूलं आणि दारुगोळा विकण्यासाठी दहिसरच्या कुंदननगर परिसरात येणार आहे. त्या माहितीनुसार युनिट 11 ची एक टिम घेऊन ते माहिती मिळालेल्या ठिकाणी पोहोचले आणि परिसरात पाळत ठेवली. काही वेळानं माहिती मिळालेली संशयित रिक्षा तिथं पोहोचल्यावर पथकानं रिक्षाला थांबवलं. रिक्षात बसलेला व्यक्ती संशयास्पद वर्तन आणि हलचाली करत होता, तेव्हा त्याला लगेच ताब्यात घेतलं आणि पंचांच्या समक्ष त्याची झडती घेतली. त्याच्याकडे 4 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं मिळाली.

illegal gun
illegal gunsakal media

याबाबत त्याची चौकशी केली, तेव्हा हे पिस्तूल आणि काडतुसं बाळगण्याचा त्याच्याकडे कोणताही पुरावा नसल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. त्यामुळं विनापरवाना शस्रास्र बाळगल्याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद घेऊन त्याच़्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3, 25 तसंच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 31(1) (अ), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल आणि काडतुसं त्यानं कुठून आणली होती, आणि तो कुणाला विकणार होता, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com