ठाणे : अमली पदार्थप्रकरणी दोघे अटकेत | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested
अमली पदार्थप्रकरणी दोघे अटकेत

ठाणे : अमली पदार्थप्रकरणी दोघे अटकेत

ठाणे : ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने (thane ncb) मुंब्रा (mumbra drug peddler) येथील दोन अमली पदार्थ विक्रेत्यांकडून ९३ हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त (MD Drug seized) केली. मोहम्मद आरिफ मोहम्मद शफी (३६, अमृतनगर, मुंब्रा) आणि चंचल नाथुराम चिनोरिया (सम्राट नगर, मुंब्रा) अशी अटकेतील आरोपींची (culprit arrested) नावे आहेत.

हेही वाचा: मुंबई : एफआयआयएच कोर्समधील डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह

मुंब्रा शहरातील वाय जंक्शन परिसरात दोन व्यक्ती एमडी पावडर या अमली पदार्थांची तस्करी व विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकास मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पोवार व त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ ग्रॅम एमडी पावडर आणि इतर मुद्देमाल असा ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

loading image
go to top