मुंबई : SRA मध्ये घर मिळवून देण्याच्या अमिषानं अनेकांना लुटणाऱ्याला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pednekar arrested

मुंबई : SRA मध्ये घर मिळवून देण्याच्या अमिषानं अनेकांना लुटणाऱ्याला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत एसआरए स्किममध्ये (SRA Scheme) घर मिळवून (home) देतो, असं सांगत अनेकांना लुबाडणाऱ्या (fraud) व्यक्तीला सायन पोलिसांनील (sion police) अटक केलीये. शरद पेडणेकर (sharad pednekar arrested) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 9 लाखात एसआरए मध्ये घर मिळवून देतो असं सांगुन त्यांच्याकडून 9 लाख (money fraud) रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्या बायकोच्या नावानं घराचं खोटं अलॉटमेंट लेटरही (fake allotment letter) तयार करुन दिलं, पण त्या फ्लॅटची मालकी दुसऱ्याच कुणाकडे असल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

मुंबईतल्या अनेकांना या आरोपीनं अशाच प्रकाचं अमिष दाखवून फसवल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय. त्यानंतर काही जणांनी पोलिसांना संपर्क केलाय, त्याचाही पोलिस तपास करत आहेत. तसंच आणखी कुणाला या व्यकेतीनं फसवलं असेल तर समोर येऊन तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

loading image
go to top