Mumbai Crime : आठवडाभरापूर्वी बाहेर आला, पुन्हा घडली जेलची वारी

Mumbai Crime : आठ दिवसांच्या कालावधीत त्याने आणखी काही चोऱ्या केल्या
Mumbai Crime
Mumbai Crime

Mumbai Crime : चोरीची शिक्षा भोगून आठवडाभरापूर्वी जेलमधून तो बाहेर आला. बाहेर येताच त्याने पुन्हा परिसरात रेकी करत बंद घरावर डल्ला मारुन घरातील सामानाची चोरी करण्याचा मार्ग पत्करला.

सावरकर रोडवरील एका घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिस तपास करत असताना पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला आणि डोंबिवली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत पुन्हा जेलची वारी घडवली आहे. सुरज उर्फ गोल्डी पटिया असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जुने कपडे खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरज करायचा त्यातूनच तो परिसरातील घरांची रेकी करत असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.

Mumbai Crime
Mumbai Health News : मुंबईकरांनो डोळ्यांची घ्या काळजी ; डोळ्यांच्या संसर्गाचे आठवड्याभरात बाराशेहून अधिक रुग्ण

डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोडवरील शामराव विठ्ठल बॅंकेजवळील एका घरात चोरीची घटना घडली होती. घरातील सोने, चांदिचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

Mumbai Crime
Kalyan News : कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत बदल !

याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गीते यांचे पथक पोलीस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सचिन भालेराव, लोखंडे, कोळेकर, सरनाईक, राठोड यांच्या पथकाने तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदार यांमार्फत शोध सुरु केला.

Mumbai Crime
Dombivli News : सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचे मतदारसंघात दुर्लक्ष; फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन शिंदे मनसेत जुंपली

डोंबिवली राहणाऱ्या सूरज याने ही चोरी केल्याची बाब पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सूरज याच्याकडून दिड लाखाचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सुरज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तीन ते चार चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Mumbai Crime
Pune Fire Accident : पळसदेव परिसरात धावत्या ट्रकला आग; मात्र...

आठवडाभरा पूर्वी तो चोरीची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा चोरीचा मार्ग स्विकारत चोरी केली. आठ दिवसांच्या कालावधीत त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का? याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com