Crime News : मुंबई विमानतळावरून 5 कोटींचे कोकोन जप्त; इथोपियाची महिला ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai CSMI Airport seized 500gms Cocaine Drugs worth Rupees 5 Crores by Customs Ethiopian lady Arrested

Crime News : मुंबई विमानतळावरून 5 कोटींचे कोकोन जप्त; इथोपियाची महिला ताब्यात

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMI) कोकोनची तस्करी करणाऱ्या एका इथोपियन महिलेला अटक करण्यात आली आहे. कस्टम्सने ही कारवाई केली असून या महिलेकडून तब्बल 5 कोटी रूपयांचे 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या बाबतची माहिती कस्टस्मसने दिली. (Mumbai CSMI Airport seized 500gms Cocaine Drugs worth Rupees 5 Crores by Customs Ethiopian lady Arrested)

संबधित महिलेचे नाव सिएरा लिओनियन असे असून ती इथोपियाच्या आदिस अबाबा येथून प्रवास करत होती. ही महिला इथोपियन एअरलाईन क्रमांक ईटी 610 या विमानातून मुंबईत दाखल झाली होती. दरम्यान मुंबई विमानतळावर संबंधित महिलेच्या पर्सची तपासणी कस्टम्सकडून करण्यात आली त्यावेळी तिच्या पर्समध्ये सुमारे 500 ग्रॅम कोकेन आढळून आले. यानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आले.