
मुंबई: माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून एका महिलेला २६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पवई येथील रहिवासी महिलेच्या बाबतीत घडला असून, तिच्या खात्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचा बनावट आरोप करण्यात आला. अटक टाळण्यासाठी तिला लाखो रुपये देण्यास भाग पाडण्यात आले.