Mumbai : महिला क्रिकेपटूच्या आईची सायबर फसवणूक

प्रसिद्ध महिला क्रिकेपटूच्या आईची सायबर फसवणूकी प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहेत
Mumbai
Mumbaiesakal

मुंबई : प्रसिद्ध महिला क्रिकेपटूच्या आईची सायबर फसवणूकी प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहेत. पतीकडून घेतलेली कर्जाची रक्कम परताव्याच्या निमित्ताने आरोपीने तक्रारदार महिलेची 1 लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारदार 54 वर्षीय महिला माहीम पश्चिम परिसरात वास्तव्यास आहेत.

Mumbai
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

9 डिसेंबरला तक्रारदार महिलेला अमित कुमार नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. फोन करणाऱ्याने तुमच्या पतीने मला 15 हजार रुपये कर्ज घेतले असून त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती दिली. त्यावेळी तुमच्या पतीने मोबाईलवर यूपीआईद्वारे रक्कम पाठवण्यास सांगितल्याचां आरोपीने दावा केला. त्यानंतर तक्रारदार यांच्या बँक खात्यात 10 व 50 हजार रुपये जमा झाल्याचे दोन संदेश आले. पुढे आरोपीने तक्रारदार महिलेला पुन्हा दूरध्वनी करून तुमच्या खात्यावर 50 हजार रुपये चुकून जमा झाले असून आरोपीच्या बँक खात्यात पुन्हा पाठवण्यास सांगितले.

त्यानंतर तक्रारदार महिलेने 50 हजार रुपये पाठवण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम हस्तांतरीत झाली नाही.अखेर अमित कुमार याने बोलण्यात गुंतवून विविध मोबाईल क्रमांकांवर सुमारे 1 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. तक्रारदार महिलेला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीसाठी आरोपीने पाच मोबाईल क्रमांकाचा वापर केला आहे. त्यांची माहिती घेऊन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com