esakal | कर्मचारी वाढवूनही विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai International Airport

Mumbai : कर्मचारी वाढवूनही विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सण उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 2 वर अचानक प्रवाशांची गर्दी वाढली होती. याप्रमाणेच देशभरातील बऱ्याच विमानतळावर परिस्थिती होती. त्यांनतर दुसऱ्या दिवशीही शनिवारी प्रवाशांची गर्दी कायम दिसून आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांनाही लोकल रेल्वे प्रमाणे विमानतळावर गर्दीचा सामना करावा लागल्याने त्रास सहन करावा लागला आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार इतर विमानतळांना धमकी आल्याने मुंबई विमानळावरील सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडक करण्यात आल्या आहे. मात्र, टर्मिनल एक बंद असल्यामुळे दुसऱ्या टर्मिनसवर गर्दी वाढली त्यामुळे शुक्रवारी विमानतळावरील परिस्थिती हाताबाहेर जाऊन कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन सुद्धा करण्यात आले.

त्यानंतर शनिवारी सुद्धा सकाळच्यावेळी गर्दी पहायला मिळाली. शुक्रवारची परिस्थिती बघता शनिवारी अतिरिक्त कर्मचारी वाढवण्यात येणार असल्याचा खुलासा विमानतळ प्रशासनाने केल्यानंतरीही विमानतळावरील गर्दी कायम होती. शिवाय दोन तास आधी पोहोचण्याचे आवाहन केल्यानंतरही चेक-इन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 40 मिनिटांहून अधिक वेळ लागत असल्याने पुन्हा नियोजनाचा अभाव दिसून आला.

loading image
go to top