मुंबई : दरेकर आणि लाड यांची बिनविरोध निवड निश्चित

मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत सर्व पक्षांचे एकमत
Pravin Darekar
Pravin Darekarsakal media

मुंबई : मुंबई जिल्हा बँक निवडणुकीचे (Mumbai District bank) अर्ज भरण्याची मुदत आज (शुक्रवार) संपली. विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर (pravin darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या दोघांचेच अर्ज (candidates application) त्यांच्या मतदारसंघातून दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. लवकरच त्यांची निवड अधिकृतपणे (Selection confirmation) जाहीर करण्यात येईल.

prasad lad
prasad ladsakal media

कोरोनाचे सावट, तसेच निवडणुकीतील पैशांची उधळपट्टी टाळण्यासाठी ही निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते. त्यानुसार काही फेरबदल करून सध्याचेच संचालक मंडळ पुन्हा पुढील पाच वर्षे सत्तेवर रहावे, असेही प्रमुख नेत्यांनी ठरविले होते. त्यानुसार आता सत्तावाटपाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे वाटून दिली जाऊ शकतात, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, शिवसेना आमदार सुनील राऊत, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, संदीप घनवट, नंदकुमार काटकर, विठ्ठलराव भोसले, अभिजीत अडसूळ, पुरुषोत्तम दळवी, आनंदराव गोळे या उमेदवारांनीही संचालकपदासाठी अर्ज केले आहेत. मजूर सहकारी संस्था मतदारसंघातील जागेसाठी दरेकर यांचाच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होईल; तर पगारदार पतसंस्था गटातून लाड यांचाच अर्ज आल्याने ते देखील बिनविरोध निवडून येतील. या बँकेचे एकूण मतदार दहा हजारांहून जास्त आहेत. महिला संस्था, मजूर संस्था, औद्योगिक संस्था, पतसंस्था, नागरी बँका, पगारदार संस्था तसेच काही वैयक्तिक सदस्य हे मतदार असतात.

सर्व संमतीने उमेदवारांची निवड

अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर अर्ज मागे घेण्याची मुदत २१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. गरज भासल्यास दोन जानेवारी रोजी निवडणूक होईल. १८ मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार असले तरीही बहुतेक सर्वपक्षीय बैठकीत ठरलेले उमेदवारच विजयी होतील. इतर सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. त्यामुळे फारतर एखाद्या ठिकाणी निवडणूक होईल, असेही प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com