

मुंबई : मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Mumbai district cooperative bank) चौकशी विरोधात बॅंकेने केलेली याचिका (petition) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) गुरुवारी नामंजूर केली. यामुळे बॅंकेतील अनियमित व्यवहारांची (irregular deals) चौकशी करण्यासाठी सहकार विभागाला हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे बॅंकेचे सर्वेसर्वा प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बॅंकांचा व्यवहार विश्वासावर सुरू असतो आणि विश्वासार्हता नेहमीच महत्वाची असते. जर चौकशी मध्ये काही अभाव आढळले तर बॅंकेला बाजू मांडण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षण न्या गिरीश कुलकर्णी यांनी नोंदविले आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती (मुंबै) सहकारी बैकेतील मागील पाच वर्षातील अनियमित कारभाराची चौकशी करण्याच्या सहकार विभागाच्या निर्णयाला बॅंकेने याचिकेद्वारे आव्हान दिले होते. बैकेविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू आहे. सहकार विभागाने देखील जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. बैकेने या विरोधात केलेल्या याचिकेवर न्या कुलकर्णी यांनी निकाल दिला आहे.
बॅंकेचे अनेक व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे तक्रारी आलेल्या आहेत याची दखल घेऊन विभागाने चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. लेखापरीक्षण आणि प्रशासकीय कामाच्या अहवालात बॅंकेच्या कारभारात गैरव्यवहार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.