Mumbai : वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai echnical failure Vande Bharat Superstar Express

Mumbai : वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड !

मुंबई - साईनगर शिर्डी -मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसमध्यें दुसऱ्या दिवशी तांत्रिक बिघाडामुळे घटना समोर आलेली आहे. या घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस दार उघडले नाही. त्यामुळे प्रवाशांना चक्क ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकावर गार्ड केबिन मधून उतरावे लागलेले आहे. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही घटना कशी घडली यावर अद्यापीय अधिकृत स्पष्टीकरण रेल्वेकडून आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 22224 साईनगर शिर्डी -मुंबई वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेस रविवारी 5 वाजून 25 मिनिटांने साईनगर शिर्डीमधून निघाली. त्यानंतर रविवारी रात्री 10 वाजून 05 मिनिटांनी ठाणेला पोहचल्यांनंतर गाडीचे दरवाजेच उघडल्या नसल्याने प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झालेला होता.

त्यानंतर आरपीएफचे जवान गाडीकडे धाव घेत प्रवाशांना गाठ केबिनमधून प्रवेश दरातून प्रवाशांना खाली सुरक्षित उतरवण्यात आलेले आहे. त्यानंतर या तांत्रिक बिगडाची पुनरावृत्ती रात्री 10.28 वाजता दादर रेल्वे स्थानकावर झाली.

या संदर्भाचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर वायरल होत आहे ही घटना कशामुळे घडली याबद्दल अधिकृत माहिती अद्यापीय मिळालेली नाही. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही घटना बोलली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केली.

या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा शनिवारपासून नागरिकांसाठी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशीं दोन्ही गाड्यामधून १७२० प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यामध्ये

मुंबई - साईनगर शिर्डी २८३ प्रवासी, सोलापूर - सीएसएमटी ९२४ प्रवासी

आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमधून ५१३ प्रवाशांचा समावेश आहे. मात्र दुसऱ्या दिवशी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीच्या प्रवाशांना नाकच त्रास झालेला आहे.