mumbai
mumbaisakal

Mumbai: 'जो फेरीवाले से बात करेगा...वही डोंबिवली पे राज करेगा'

डोंबिवलीतील फेरीवाल्यांचे सर्व पक्षांना आव्हान

डोंबिवली - डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हे मनसेच्या दणक्यानंतर स्टेशन परिसरातून हटले आहेत. स्टेशन परिसरातील फेरीवाले, रिक्षा चालक यांची कोंडी फोडण्यासाठी काय नियोजन करण्यात येईल याची प्रायोगिक तत्वावर मनसेच्या वतीने पाहणी करण्यात आली.

यावेळी फेरीवाला संघटनेचे नेते बबन कांबळे यांनी "जो फेरीवाले से बात करेगा...वही डोंबिवली पे राज करेगा" अस खुले आव्हान सर्व पक्षांना दिले आहे.

आमदार राजु दादा पाटील यांच्या सुचनेनुसार सोमवारी पुन्हा एकदा डोंबिवली पुर्व स्टेशन परीसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी स्टेशन परिसरात पाहणी केली.

mumbai
Sangli : रेठरेची ‘महिब्या-बकासूर’ची जोडी विजेती!

यावेळी फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संजय साबळे,डोंबिवली वाहतुक शाखेचे उमेश गित्ते, कल्याण आरटीओ अधिकारी बालाजी गोंदरवाड, पवार तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी काळु कोमासकर, सचिन गुरव व फेरीवाला संघटनेचे बबन कांबळे उपस्थित होते.

यावेळी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी याविषयी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दीडशे मीटरचा परिसर हा फेरीवाला मुक्त राहिला पाहिजे. डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाल्यांची समस्या आहे. आमदार राजू पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी एक पाहणी दौरा केला होता.

mumbai
Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून होणार लागू ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

त्यानंतर आयुक्तांकडे एक भेट झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी असे निर्देश दिले होते की स्टेशन परिसरात रिक्षा थांब्याचे कसे नियोजन करता येईल ते पहावे. त्यासाठी आज रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. प्रवाशांना सोयीस्कर रिक्षा थांबा कसा मिळेल यावर चर्चा करण्यात आली.

प्रायोगिक तत्त्वावर येथे काही प्रयोग केले जातील त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. यावेळी फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. स्टेशन परिसरात आम्हाला हटवून रिक्षावाल्यांना थांबा का देत आहात ?

असा सवाल करत फेरीवाला आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये वाद निर्माण करत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी मनसेवर केला.

mumbai
Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून होणार लागू ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

यावर मनोज घरत म्हणाले, त्यांचे म्हणणे देखील बरोबर आहे वर्षानुवर्ष येथे ज्या पक्षाचे सरकार आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात फेरीवाल्यांचे नियोजन केले नाही. त्यांचे नियोजन तेव्हाच झाले असते. तर आज हा मुद्दा आला नसता.

येत्या तीन दिवसांच्या आत टाउन वेंडिंग कमिटी यांची मीटिंग होणार असून फेरीवाल्याचे प्रश्न निकाली निघतील असे घरत यांनी सांगितले.

यावर फेरीवाला संघटनेचे नेते कांबळे म्हणाले, जो फेरीवाले से बात करेगा...वही डोंबिवली पे राज करेगा" जो पक्ष आम्हाला मदत करेल त्यांना आम्ही देखील सहकार्य करू असे कांबळे यांनी यावेळी सांगितले.

कांबळे यांच्या या वक्तव्यामुळे येत्या निवडणूकी आधी प्रशासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर फेरीवाला मुद्दा पेटू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com