
मुंबई: मुंबईत आज कोरोनामुळे ५४ मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढली असून आज 9925 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,44,942वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 87,443 हजारांवर आला आहे.
आज दिवसभरात 54 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 140 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 33 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 30 पुरुष तर 24 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 15 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 37 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.
दरम्यान 9,273 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 4,44,214 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 87,443 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.71 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 40 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 47,55,733 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत 90 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 995 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 30,549 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत.
जी उत्तर मध्ये 337 नवे रुग्ण
जी उत्तर मध्ये आज 337 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 21,350 झाली आहे.धारावीत आज 65 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5839 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 147 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 7712 झाली आहे. माहीम मध्ये 82, रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 7674 इतके रुग्ण झाले आहेत.
(संपादन - दीनानाथ परब)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.