Mumbai : मासिक पाळीतील अज्ञानाविरोधात लढा

स्वच्छतेबाबत प्रबोधन गरजेचे; प्रयत्न तोकडे
Periods Problems
Periods Problemssakal

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल - ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’मागे महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, हा यामागचा उद्देश आहे. खेड्यापाड्यात तसेच शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये स्त्रिया आजही यासंबंधीच्या महत्त्वाच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. या महिलांना शास्त्रशुद्ध वैद्यकीय पद्धतीने माहिती मिळत नसल्याने आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचबरोबर सामाजिक संस्थांची जबाबदारी यामुळे अधिक वाढत असल्याचे या दिनानिमित्त नक्कीच म्हणावे लागेल.

पाळीआली आहे ना, मग मंदिरात नको जाऊ, देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला शिवायचं नाही, स्वयंपाक घरात शिरायचं नाही, चार-पाच दिवस वेगळं राहायचं... पाचव्या दिवशी पाळी थांबली की अंघोळ करायची आणि शुद्ध व्हायचं, २१ व्या शतकात वावरताना आजही सर्रास अनेक ठिकाणी हेच चालते.

Periods Problems
Mumbai : सहकारी गृहनिर्माण परिषदेत झालेल्या घोषणांचे जीआर कधी; आमदार प्रवीण दरेकर

समाजात मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज आजही दूर झालेले नाहीत. त्यामुळे महिलांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. याशिवाय महिलांचा थोडासा निष्काळजीपणा त्यांना हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, तसेच वेगवेगळे संसर्ग गंभीर आजारांना निमंत्रण देत आहेत. त्याचा परिणाम महिलांच्या शारीरिकच नाही तर मानसिकतेवरही होत आहे. पनवेल परिसरही याला अपवाद राहिला नाही. कारण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांतील महिलांना मासिक पाळी वेळी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

१ मध्यम वर्गात आणि उच्च वर्गातील महिलांमध्ये ही मासिक पाळीला घेऊन स्वच्छता आणि अस्वच्छतेबाबतचे अनेक प्रश्न आहेत. इमारतींच्या बांधकामांमध्ये, वेग-वेगळ्या रहिवाशी सोसायट्यांमध्ये घरकाम अथवा स्वयंपाकाचे काम करणाऱ्या अशा अनेक महिलांमध्ये मासिका पाळीच्या काळात आरोग्याच्या सुविधा उद्भवत आहेत.

२ नवी मुंबई सारख्या शहरातही मोक्याच्या जागावर स्वच्छ शौचालये नाहीत. पामबीच मार्गावर सीबीडी-बेलापूर ते वाशी दरम्यान महिलांना शौचालयाची जागा नाही. ई-टॉयलेट्स केव्हाच नामशेष झाले आहेत. अशीच परिस्थिती ठाणे-बेलापूर मार्गावर आहे. या दोन्ही मार्गाहून सर्वच प्रकारच्या गटातील महिला बस, कार आणि दुचाकीने प्रवास करीत असतात. शौचालयाची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबना होते.

३ नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाशी ते पनवेल आणि ठाणे मार्गावरील सौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडर मशिनची सोय केलेली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा नोकरदार वर्गातील महिला प्रवास करीत असतात. या दरम्यान अचानक पाळी आल्यानंतर नॅपकिनची सोय नसते. नॅपकीन पुरवणाऱ्या यंत्रणा कमी पडत आहेत.

Periods Problems
Mumbai Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी लोढा यांची पोक्सोनुसार कारवाईची मागणी

विविध आजार बळावण्याची मुख्य कारणे

पनवेल तालुक्यातील खेडेगाव, त्याचबरोबर गरीब लोकवस्ती आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांतील महिलांना मासिक पाळी आणि स्वच्छता याविषयी जनजागृती आणि प्रबोधन करणे काळाची गरज आहे; परंतु महापालिका प्रशासन, त्याचबरोबर तालुका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अलीकडे अत्यंत कमी वयामध्ये मुलींना मासिक पाळी येत असल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.

Periods Problems
Mumbai : मुंबईतील नालेसफाई ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही; विरोधी पक्षातील नेत्याचा दावा

शालेय विद्यार्थिनींना मासिक पाळीबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणे उपयुक्त ठरेल; परंतु शाळांमध्ये अशाप्रकारे जनजागृती होतच नाही.महिला अनावधानाने कोणत्याही प्राणघातक आजाराला बळी पडू नयेत, या उद्देशाने मोठ्या प्रमाणात हा मासिक पाळी दिवस साजरा होणे गरजेचे आहे. यानिमित्ताने गरीब वस्त्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यापलीकडे कोणतीही जनजागृती केली जात नाही.

Periods Problems
Mumbai : मुंबईतील नालेसफाई ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही; विरोधी पक्षातील नेत्याचा दावा

मासिक पाळीच्या दिवसांत निरोगी जीवनशैलीची ग्वाही देण्यासाठी प्रयत्न करणे, या दिवसाचे उद्दिष्ट आहे; परंतु सामाजिक मानसिकता, शासकीय उदासीनता, तसेच अशिक्षितपणामुळे ते साध्य होत नाही.

- वैशाली जगदाळे, संस्थापिका, संकल्प फाऊंडेशन

आजही समाजात महिलांना पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळेच महिलांसाठी स्वच्छ शौचालये देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

- वृषाली मगदूम, स्त्री मुक्ती संघटना, विश्वस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com