मुंबई : 'वन अविघ्न पार्क'च्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचा 'हा' निर्णय

fire brigade
fire brigadesakal media

मुंबई : करी रोड (curry road) येथील वन अविघ्न पार्क (one avighna park) इमारतीत आगीच्या वेळी अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणेतून (Fire extinguisher) अपेक्षित दाबाने पाणी आले असते तर आग भडकण्याची शक्‍यता कमी होती, असे निरीक्षण अग्निशमन दलाने (fire brigade authorities) नोंदवले आहे. त्यामुळे या आगीनंतर पुन्हा मुंबईतील सर्व टॉवरमधील (Mumbai towers) अग्निप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे.

fire brigade
दोन लशी घेतलेल्यांना रोजची रेल्वे तिकिटे द्यावे; भाजप महिला मोर्चाची मागणी

अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर इमारतीतील अग्निप्रतिबंधक वाहिनीतून आवश्‍यक दाबाने पाणी आले नाही. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ही आग २० व्या मजल्यापर्यंत पसरली होती. सुमारे पाच तासांनी ही आग पूर्णपणे क्षमली. यापूर्वीही आग लागल्यानंतर त्या ठिकाणची अग्निप्रतिबंधक यंत्रणा आवश्‍यक पद्धतीने काम करत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने पुन्हा मुंबईतील सर्व टॉवरचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा दुर्घटना झाल्यानंतरच अग्निशमन दलाकडून अशाप्रकारचे ऑडिट केले जात असल्याची टीकाही करण्यात येत आहे.

पुरावे गोळा करण्यास सुरुवात

अग्निशमन दलाने आगीची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या आगीचा अहवाल जास्तीत जास्त आठ दिवसांत तयार होईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

"इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणांमधून सुरुवातीला अपेक्षित दाबाने पाणी आले नाही. नंतर पाण्याचा दाब वाढला. चौकशीत याबाबत निश्‍चित माहिती उजेडात येईल. त्याचबरोबर आता सर्व टॉवर्सची तपासणी करण्यात येईल."
- हेमंत परब, प्रमुख अग्निशमन अधिकारी.

दर सहा महिन्यांनी आडिट अपेक्षित

महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायद्यानुसार इमारतींचे दर सहा महिन्यानी नोंदणीकृत संस्थेकडून फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. तसा अहवाल अग्निशमन दलाला सादर करावा लागतो. तसेच, फायर ड्रील घेणेही आवश्‍यक आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com