Mumbai Firing : मुंबईत अज्ञातांकडून गोळीबार; 1 ठार 3 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing

Mumbai Firing : मुंबईत अज्ञातांकडून गोळीबार; 1 ठार 3 जखमी

मुंबई : मुंबईत कांदिवली येथे दोन अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल केले असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(Mumbai Fire Latest Updates)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Mumbai Newscrimefire