मुंबईत कोविडसह 'या' 'रोगाचीही एकत्रित करता येणार चाचणी

भाग्यश्री भुवड
Thursday, 18 February 2021

मुंबईत कोविड-19 आणि क्षयरोगाच्या चाचणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पाच ट्रूनट™️ मशिन्‍स बसवण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबईत कोविड-19 आणि क्षयरोगाच्या चाचणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पाच ट्रूनट™️ मशिन्‍स बसवण्यात येणार आहे. त्यामुळे, जलद प्रतिजैविक चाचण्‍यांमध्‍ये निगेटिव्‍ह ठरलेल्‍या लक्षणे असलेल्‍या लोकांसाठी जलद, ऑनसाइट कोविड-19 च्या चाचणीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी आणि कोविड-19 ची लक्षणे असलेल्‍या लोकांच्‍या क्षयरोग तपासणी सुविधेसाठी मशीन्सची मदत होणार आहे. 

याबाबतचा फाऊंडेशन फॉर इनोव्‍हेटिव न्‍यू डायग्‍नोस्टिक्‍स आणि इंडिया हेल्‍थ फंडने मुंबई महानगरपालिकेसोबत करार केला आहे. ज्यातून मुंबईत कोविड-19 आणि क्षयरोग दुहेरी चाचणी उपलब्‍धतेमध्‍ये वाढ होईल.

कोविड-19 आणि टीबी हे समान वैद्यकीय लक्षणे असलेले आजार आहेत आणि दोन्‍ही आजार श्‍वसनविषयक ड्रॉपलेट्स आणि एरोसोल्‍सच्‍या माध्‍यमातून संक्रमित होतात.

कोविड-19 आणि टीबीच्‍या दुहेरी आव्‍हानांचा सामना करण्‍यासाठी मुंबईत सादर करण्‍यात आलेल्‍या चाचणीमध्‍ये आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालय (एमओएचएफडब्‍ल्‍यू), भारत सरकारने जारी केलेल्‍या बाय-डायरेक्‍टशनल स्क्रिनिंग मार्गदर्शक तत्त्वांच्‍या (म्‍हणजेच टीबीसह निदान झालेल्‍या सर्व लोकांची कोविड-१९ चाचणी करणे आणि कोविड-19 ची लागण झालेल्‍या सर्वांची टीबीसाठी चाचणी करणे) या अंमलबजावणीचा समावेश आहे. 

60 मिनिटांत चाचणी अहवाल

ट्रूनट हे गोवा-स्थित मोल्बिओ डायग्‍नोस्टिक्‍सद्वारे विकसित करण्‍यात आलेले नाविन्‍यपूर्ण अनेक आजाराचे निदान करणारे मशीन आहे. ट्रूनट हे फाइण्‍ड आणि आयएचएफ यांच्‍या सहयोगाने भारतामध्‍ये विकसित करण्‍यात आले असून चिपच्या आधारे 60 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्‍ये चाचणी अहवाल देते. ही मशीन टीबीसह विविध आजारांची चाचणी करण्‍यासाठी रिव्‍हर्स ट्रान्स्क्रिप्‍शन पॉलिमेरस चेन रिअॅक्‍शनचा (आरटी-पीसीआर) उपयोग करते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवडण्‍यात आलेले प्रत्‍येक पालिकेचे ठिकाण आता ट्रूनट व्‍यासपीठ, आवश्‍यक प्रयोगशाळा कर्मचारी, चाचणी साहित्‍य आणि उपभोग्‍य वस्‍तूंसह सुसज्‍ज आहेत. या चाचणी सुविधा त्‍याच परिसरामध्‍ये किंवा जलद प्रतिजैविक चाचणी करणा-या ठिकाणांपासून जवळच असतील. ज्‍यामुळे नमुना गोळा करण्‍यासोबत ते ने-आण करण्‍याची आव्‍हाने कमी होतील. रूग्‍णांसाठी प्रतिक्षा करावा लागणारा वेळ कमी होईल आणि कोविड-19 चा प्रसार होण्‍याची शक्‍यता कमी होईल. परिणामत: कोविड-19 च्‍या केसेस समजण्‍यामध्‍ये मदत होईल. आणि हॉटस्‍पॉट्स (संसर्गित स्‍थळे) जलदपणे ओळखता येऊ शकतील.

हेही वाचा- फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

फाइण्‍ड इंडियाचे प्रमुख संजय सरिन म्‍हणाले, ''टीबी आणि कोविड- 19 या दोन्‍ही आजारांचे प्रमाण वाढले असल्‍यामुळे दोन्‍ही आजारांकरिता एकीकृत तपासणी हे मुंबईसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यातून आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्‍यास मदत होईल.''

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai five true machines installed municipal hospitals testing covid 19 and tuberculosis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai five true machines installed municipal hospitals testing covid 19 and tuberculosis