विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, चौघांना अटक

विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, चौघांना अटक

मुंबईः  विम्याचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला चौघांनी तीन कोटी 88 लाख 10 हजार 988 रुपयांना चुना लावला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली आणि उत्तरप्रदेश परिसरातून चौघांना अटक केली आहे. या आरोपींनी अशा प्रकार अनेकांची फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात जम्मू काश्मिर, बेंगलोर, आंध्रप्रदेश येथेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तापासत निष्पन्न झाले आहे.

विलेपार्लेच्या कालडोंगरी परिसरात राहणारे रांजेद्र मांडविया हे स्वत: एलआयसी एजंट आणि अकाऊन्टट आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांनी विविध कंपन्यांकडून मुलीच्या नावे 20 लाख 89 हजार 922 विमा काढला, मात्र त्यानंतर त्यांनी उरलेल्या विम्याचा प्रिमियममध्ये भरावयाच्या नसून त्या वेगवेगळ्या कालावधीकरिता असल्याने ते त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या विमा रद्द केल्या, त्यानंतर काही दिवसांनी इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना 18 लाख 2 हजार 922 इतकी रक्कम मिळाली. भरलेल्या रक्कमेपैकी 2 लाख 86 हजार येणे बाकी होते. त्याबाबत राजेंद्र हे पाठपुरावा करत होते.

ही रक्कम मिळवण्यासाठी परदेशी शांतीलाल गंभीर उर्फ राहुल गोयल, राजेश कुमार दिपचंद कश्याप, विजयकुमार राजेंद्र कुमार, अजय कश्याप यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आलं. तक्रारदार राजेंद्र यांना वेगवेगळ्या 48 बँक खात्यांमध्ये टप्या टप्याने 3 कोटी 88 लाख 10 हजार 988 इतकी रक्कम भरण्यास सांगितली. पैसे जमा झाल्यानंतर आरोपींचे फोन बंद येत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजेंद्र मांडविया यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखा 6 कडे वर्ग करण्यात आला.

या गुन्ह्यांतील तपासासाठी पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाच्या तपासात गुन्ह्यात वापरण्या आलेली सर्व बँक खातीही दिल्ली, नोएडा आणि उत्तरप्रदेश मधील होती. ही खाती एकाच अधिकाऱ्याचे फोटो आणि नाव वारंवार बदलून उघडण्यात आली होती. बँकेत पैसे जमा झाले की, आरोपी लगेचचे पैसे काढून घ्यायचे. या टोळीने अशा प्रकारे जम्मू काश्मिर, बेंगलोर, आंध्रप्रदेश मधील शेकडो नागरिकांना अशा प्रकारे गंडवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Fraud in the name of getting insurance money four arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com