esakal | मुंबई : अल्पवयीन मुलीवर बेशुद्धावस्थेत बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बेशुद्धावस्थेत बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नेरुळमधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला इंजेक्शन देऊन तिच्यावर बेशुद्धावस्थेत दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या मैत्रीणीनेच पीडितेला शीतपेयामधून दारु पाजुन तिला तरुणांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. नेरूळ पोलिसांनी शनिवारी (ता. ११) आरोपींविरोधात बलात्कारासह, अपहरण व पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये ही घटना घडली. पीडितेच्या घराजवळच राहणाऱ्या तिच्या मैत्रीणीने तिला दुपारी जुईनगर येथील चिंचोली तलावाजवळील उद्यानात खेळण्याच्या बहाण्याने नेले होते. त्यावेळी पीडितेला तिने शीतपेयातून दारू पाजली. नंतर चक्कर आल्याने पीडिता उद्यानातील बाकड्यावर बसली असता मैत्रिणीने दोन तरुणांना बोलावून घेतले. तरुणांनी पीडितेला त्याच अवस्थेत कारमधून एका इमारतीत नेले.

हेही वाचा: उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पाहा व्हिडिओ

दुसऱ्या दिवशी पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिच्या अंगावर चादरीशिवाय एकही कपडा नव्हता. याबाबत मैत्रिणीला विचारले असता कपडे ओले झाल्याने काढून ठेवल्याचे तिने सांगितले. त्यानंतर एका खोलीत नेत आरोपींनी मुलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर अत्याचार करणाऱ्या तरूणांनी पैसे दिल्याचे व ती येथेच राहिल्यास तिचा चांगला फायदा होईल, असे मैत्रिणीने तिला सांगितले. त्यानंतर पुन्हा तिने पीडितेला दारू पाजल्याने ती बेशुद्ध झाली. तिसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर संधी साधुन पीडितेने तेथून पलायन करत आपले घर गाठले.

समुपदेशनानंतर घटना उघडकीस

घटनेनंतर पीडिता व्यसनाधिन झाल्यानंतर तिच्या आईने खारघर येथील युवा चाईल्ड लाईन संस्थेला संपर्क साधला होता; मात्र पीडितेने संस्थेच्या सदस्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ठाणे बालकल्याण समितीने पीडितेचे समुपदेशन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तीचे समुपदेशन केल्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती त्यांना सांगितली.

loading image
go to top