पतीशी सेल्फीवरून वाद, विक्रोळीत बायकोची धावत्या लोकलपुढे उडी

प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती झाली उघड
Railway-Suicide
Railway-Suicide
Summary

प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती झाली उघड

मुंबई: मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील विक्रोळी (Vikhroli) रेल्वे स्थानकात धावती लोकल (local train) येत असल्याचे पाहून एका २७ वर्षीय तरूणीने रेल्वे रूळावर उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. प्राथमिक चौकशीत (Prima Facie) पतीशी सेल्फीवरून भांडण झाल्यामुळे तरूणीने आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. या विरोधात कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी (Kurla Railway Police) गुन्हा नोंदविला असून घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. (Mumbai Girl Ends her Life Over Selfie at Vikhroli Station Husband In Laws Booked for Harassments)

Railway-Suicide
मुंबईकरांना आज 'या' केंद्रांवर मिळणार लस

नक्की काय घडलं?

शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक 4 येथे संजना शेरे (27) बराच वेळ बसली होती. काही वेळानंतर धावती लोकल वेगाने येत असल्याचे पाहताच संजनाने रेल्वे रूळावर उडी मारली. त्यानंतर रेल्वे मार्गावर आडवी झोपून एका रुळावर मान ठेवली. अवघ्या काही सेकंदात धावती लोकल तिच्या अंगावरून गेली आणि यात तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Post Mortem) नेण्यात आला. या प्रकरणाची कुर्ला लोहमार्ग पोलीस चौकशी करत आहे.

Railway-Suicide
मुंबईच्या काळा घोडा चौकाच्या नामांतरावरून पुन्हा वाद

आत्महत्येचं कारण काय?

संजना हिचे तिच्या पतीसोबत दोन दिवसांपूर्वी एका सेल्फीवरून भांडण झाल्याचं सांगितलं जातंय. संजनाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार, तिचा पती संजनाला काही कारणांमुळे मारहाण करायचा. तसेच, तिच्या सासरची मंडळी तिला मातृत्वावरून हिणवायचे. पतीसोबत कडाक्याचं भांडण झाल्यानंतर शुक्रवारी घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून रागाच्या भरात तिने घर सोडले. संजना विक्रोळी स्थानकात बराच वेळ बसली होती. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन याची माहिती कुटुंबियांना मोबाइलवरून मेसेज पाठवून दिली. त्यानंतर तिने लोकल वेगाने येत असल्याचे पाहिलं. ते पाहून तिने रूळांवर उडी घेत जीवन संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com