esakal | बापरे! मुंबई- गोवा चौपदरीकण कामादरम्यान आत्तापर्यंत २४४२ अपघाती मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai - goa highway

बापरे! मुंबई- गोवा चौपदरीकण कामादरम्यान आत्तापर्यंत २४४२ अपघाती मृत्यू

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर टोलवसुली (Toll Collection) करणार कि टप्याटप्याने टोल लावणार असा प्रश्न आज मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court) राज्य सरकारला केला. दरम्यान चौपदरीकरणाचे कामादरम्यान आतापर्यंत 2442 जणांचा अपघातात दुर्दैवी (Accidents) मृत्यू झाला आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली. ( Mumbai goa highway four lane working tenure so many people died in Accident till now )

मुंबई गोवा महामार्गावर असलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वकील ओवेस पेचकर यांनी याचिका केली आहे. याचिकेवर मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मागील दहा वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे आणि आतापर्यंत 2442 अपघाती मृत्यू झाले आहेत, असे याचिकादाराकडून सांगण्यात आले. तसेच सुमारे62 टक्के काम पूर्ण झाले असले तरी इंदापूर ते झाराप या कामासाठी आणखी किमान दोनशे कोटींचा निधी आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी संथगतीने काम सुरू आहे असेही ते म्हणाले. याबाबत खंडपीठाने राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. तसेच पुढील सुनावणीला तपशील दाखल करण्याचे निर्देश सरकारला दिले. राज्य सरकारकडून महाधिवक्तांनी बाजू मांडली.

हेही वाचा: अनुदानित शाळांकडून अवैधरित्या शुल्क वसुली, पालकांची केली जातेय फसवणूक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे. सध्या केवळ 62 टक्के काम पूर्ण झाले असून काम पूर्ण न करणार्‍या दिलीप बिल्डकॉन, केसीसी बिल्डकॉन, के टी इन्फ्रा, चेतक इंटरप्राईसेस, एमईपी सांजोस या कंत्राटदारांच्या नावाची यादी दिली आहे., तसेच डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण होण्याची हमीदेखील दिली आहे

loading image