
Mumbai Latest News: गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल फोन न दिल्यामुळे आई-वडिलांशी झालेल्या भांडणातून एका १४ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.