मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार; महापालिकेकडून वैद्यकीय यंत्रणेची नव्याने संरचना

मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार; महापालिकेकडून वैद्यकीय यंत्रणेची नव्याने संरचना

मुंबई  : कोव्हिडनंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत मुळापासून बदल करण्यात येणार आहे. येत्या काळात विभागातील आजारानुसार तेथील वैद्यकीय यंत्रणा तयार केली जाणार आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत महापालिकेला मुंबईतील प्रत्येक घरातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार भविष्यात प्रभागांमधील आरोग्य व्यवस्था राबविण्याचा विचार महानगर पालिकेचा आहे. सध्या ही माहिती संग्रहीत केली जात असून त्याचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग प्रत्येक विभागानुसार आरोग्य व्यवस्था राबवण्यासाठी करण्याचा प्रयत्न असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले. 

पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत 30 लाखांहून अधिक नागरिक 50 वर्षांवरील आहे. एखाद्या प्रभागात मधुमेहाचे अधिक रुग्ण असतील, त्याप्रमाणे प्रभागात आवश्‍यक वैद्यकिय यंत्रणा उभारली जाईल. एखाद्या विभागात श्‍वसनाच्या आजाराचे रुग्ण जास्त असतील, तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर 60 हजार नागरिकांसाठी एक आरोग्य केंद्र अशी रचना केली जाणार आहे. त्यातून सर्वेक्षण करून आरोग्याबाबत माहिती घेतली जाईल, अशी माहिती ककाणी यांनी दिली. 

सायंकाळी दवाखाने सुरू होणार 
सध्या 15 दवाखाने सायंकाळीही सुरू ठेवण्यात येतात. त्यातील बहुतेक दवाखान्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या वर्षात 30 ते 35 दवाखाने सायंकाळीवेळी सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. 

महापालिकेचे दवाखाने 
एकूण दवाखाने ः 183 
सायंकाळचे दवाखाने ः 15 
आयुर्वेदिक ः 4 
युनानी ः 2 

mumbai health Will change the face of Mumbais health system New structure of medical system from Municipal Corporation

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com