Mumbai: नाकाच्या शस्त्रक्रिये दरम्यान हृदयाचे ठोके झाले बंद; वाचा धक्कादायक प्रकार

crime
crime esakal

Panvel: नाकात वाढलेल्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेलमधील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धार्थ काटकर असे तरुणाचे नाव असून लाईफलाईन हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

तरुणाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशीला सुरुवात केली आहे.

crime
Pune Crime News : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला अटक; अप्पा बळवंत चौकाजवळ भरदिवसा घडली घटना

मृत सिद्धार्थ काटकर हा खालापूर येथील मोपाडा येथे आई-वडील व बहिणीसह राहत होता. त्याच्या नाकाचे हाड वाढल्याने त्याला मागील दोन वर्षांपासून श्‍वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर पनवेलमधील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला सोमवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया दुपारी १ वाजता करण्याचे ठरल्याने सिद्धार्थच्या सर्व तपासण्या करून दुपारी १ वाजता त्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.

crime
Pune Crime : खरेदीच्या बहाण्याने ९० हजारांचे दागिने लंपास

हृदय बंद पडल्याचे कारण
शस्त्रक्रिया सुरू असताना दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रिया थिएटरमधून डॉक्टरांनी बाहेर येऊन सिद्धार्थच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याचे तसेच त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

या घटनेमुळे सिद्धार्थच्या कुटुंबियांना धक्का बसला. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी सिद्धार्थ व्यवस्थित होता. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न सिद्धार्थच्या कुटुंबियांनी करून लाईफलाईन हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

सिद्धार्थ काटकर याला ॲलर्जी होती. त्याबाबतच्या त्याच्या सर्व तपासण्यादेखील करण्यात आल्या होत्या. सोमवारी शस्त्रक्रियेवेळी त्याला भूल देण्यासाठी कोलिन नावाचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्याचे हृदय बंद पडले. त्यामुळे आम्ही त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. सिद्धार्थच्या शवविच्छेदनात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
- डॉ. जयेश्री पाटील, लाईफलाईन हॉस्पिटल, पनवेल

crime
Pune Crime News : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या उत्तरप्रदेशातील टोळीला अटक; अप्पा बळवंत चौकाजवळ भरदिवसा घडली घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com