मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती

समीर सुर्वे
Friday, 18 September 2020

मुंबईसह उपनगरांत सोमवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : मुंबईसह उपनगरांत सोमवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता असून, रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथे अंबर अलर्ट जारी केला आहे.

'ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत काही अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर, कुलाबा येथे आज कमाल 29.6 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे किमान 30.9 आणि कमाल 24.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत सोमवारपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुंबईत उद्याही तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता असून, शनिवारी तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे.

पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याविषयी कायदेशीर सल्ला घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख

दक्षिण कोकणात अंबर अलर्ट जारी
महामुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्‍यता असली, तरी दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रविवारपर्यंत या भागात जोरदार पाऊस, तर रविवारपासून मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. काही भागात 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai heat rise Find out the weather conditions in Thane, Palghar and Raigad districts