esakal | पावसाने 'नॅशनल पार्क'ला झोडपले, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai monsoon

पावसाने 'नॅशनल पार्क'ला झोडपले, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची कसरत

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईला (Mumbai Rain) झोडपून काढणाऱ्या पावसाचा 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ला (National Park) ही फटका बसला. पार्कातील नदी,नाले,रस्ते,ओढे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहिल्याने प्राणी बिथरले. तर कार्यालय आणि रहिवासी संकुलात (Water Logged) पाणी घुसल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. पावसाच्या पाण्याने काही महत्वाची कागदपत्रे ही भिजल्याने नुकसान झाले आहे. ( Mumbai Heavy Rainfall also Affects to Sanjay Gandhi National Park-Nss91)

शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने उद्यानात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. उद्यानातील बहुतांश परिसर जलमय झाला होता. याचा फटका उद्यानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसला. पावसाचे पाणी कार्यालयात शिरले तसेच तेथील नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरात देखील पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांना रात्रभर घरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करावा लागला. गेल्या काही वर्षांत चार वेळा अशा प्रकारे त्रास सहन करावा लागण्याचे इथले कर्मचारी सांगतात. रात्री पाऊस असल्याने कार्यालय आणि कर्मचारी संकुलात पाणी शिरले मात्र कुठल्याही प्रकारची मालमत्ता किंवा जीवित हानी झाली नसल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं...

पावसामुळे उद्यानाता पाणीच पाणी साचले. त्यामुळे उद्यानातील रस्ते उखडले तर पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे ही जी मल्लिकार्जुन म्हणाले. उद्यानासाठी राज्य सरकारने काही वर्षात पूर्वी मोठी आर्थिक तरतूद केली होती. मात्र या पैशांचा वापर न झाल्याने ते अनुदान परत गेले. तर तत्कालीन संचालक विकास गुप्तता यांनी कार्यालयाच्या डागडुजी ऐवजी रेस्ट हाऊस च्या डागडुजीसाठी 1 कोटी रुपये अनावश्यक खर्च केला. अशा निर्णयांमुळे आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचा आरोप कंझर्वेशन अॅक्शन ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी देबि गोएन्का यांनी केला आहे.

पाण्यातून मार्ग काढण्यासाठी प्राण्यांची धडपड

मुसळधार पावसामुळे उद्यानातील पशु-पक्षी तसेच प्राणी ही बिथरले. उद्यानात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने प्राण्यांना त्यातून मार्ग काढत आपला जीव वाचवावा लागला. 5 ते 6 फूट भरलेल्या पाण्यातून हरीण मार्ग शोधत असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. या व्हिडीओ ची खातरजमा करत असल्याची माहिती मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी दिली.

loading image