esakal | मुंबईत दरडींचा धोका कायम; मालाडच्या ३५० नागरिकांचे स्थलांतर
sakal

बोलून बातमी शोधा

landslide

मुंबईत दरडींचा धोका कायम; मालाडच्या ३५० नागरिकांचे स्थलांतर

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :पावसाने जोर (heavy rainfall) धरल्यानंतर मुंबईत (Mumbai) पुन्हा दरड कोसळण्याचा (landslide) धोका निर्माण झाला आहे. साकीनाका (sakinaka) येथे एक जण जखमी झाला आहे. तर, मालाड येथून 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबईतील काही भागात पाणी साचल्याने (water logging) वाहतुकीवरही परीणाम (traffic issue) झाला होता.

हेही वाचा: 'बजरंग बली की जय' ; कासा येथे वानराने फोडली दहीहंडी

साकिनाका येथे डोंगरावरील दगड माती वस्तीवर आल्याने जीवासचा शहा हे 47 वर्षिय गृहस्थ किरकोळ जखमी झाले.त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालया उपचार करुन घरी सोडण्यात आले.तर,मालाड कुरार व्हिलेज येथील आंबेडकर नगर परीसरातील डोंगरावरील दगड माती संरक्षण भिंतीं वर पडू लागली.या परीसरातील 350 नागरीकांचे आता पर्यंत महानगर पालिकेच्या शाळेत स्थालांतरीत करण्यात आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचले होते.त्यामुळे वाहतुकीवर परीणाम झाला होता.

जुलै महिन्यात मुंबईत चेंबूर,घाटकोपर,भांडूप येथे दरड कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर राज्य सरकारने युध्द पातळीवर दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागासाठी उपाय करण्यासाठी बैठका घेण्यास सुरवात केली.मात्र,यात हे भाग संरक्षीत करण्यासाठी महानगर पालिका उपाय सुचवणार असून भुखंडाची मालकी असलेले प्राधिकरणे उपाय करणार आहेत.

loading image
go to top