करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad
करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : अभियंता अनंत करमुसे यांच्या कथीत आपहरण आणि मारहाण प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करमुसे यांनी हायकोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं फेटाळून लावली, त्यामुळं आव्हाडांसाठी हा दिलासा आहे. न्या. पी. बी. वारले आणि न्या. ए. एम. मोडक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. (Mumbai High Court given relief to Jitendra Awhad in Karamuse assault case)

व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांनी सन २०२० मध्ये सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्ते करमुसेंना आव्हाडांच्या घरी घेऊन गेले होते. यावेळी आव्हाडांनी कुरमुसेंना मारहाण केली होती. यानंतर वर्षभरानंतर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. पुढे ठाणे कोर्टानं आव्हाड यांची जामिनावर सुटका केली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा अशी मागणी याचिकाकर्ते कुरमुसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. पण कोर्टानं त्यांची मागणी फेटाळून लावली.

Web Title: Mumbai High Court Given Relief To Jitendra Awhad In Karamuse Assault Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top