esakal | खासगी अवयवात बोट घालणे हा देखील बलात्कारच - मुंबई हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

court

खासगी अवयवात बोट घालणे हा देखील बलात्कारच - मुंबई हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

सकाळ व्रुत्तसेवा

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने (Session Court) गतीमंद महिलेवरील बलात्काराच्या (Rape Allegations) आरोपात सुनावलेली सक्तमजुरीची सजा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कायम केली. महिलेच्या खासगी अवयवात बोट घालणे हादेखील बलात्कारच आहे, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने एप्रिल 2019 मध्ये आरोपीला (Accused) दोषी ठरवून सजा सुनावली होती. या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील याचिका (Appeal Petition) केली होती. न्या रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे खंडन केले होते. महिलेच्या गुप्तांगामध्ये बोट घातले होते, मात्र बलात्कार केला नाही, असा बचाव केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. आरोपीची ही कृती बलात्कार (Rape mindset) करण्यासारखी आहे आणि यामुळे पिडितेला (Victim) जखम झाल्याचा वैद्यकीय अहवाल आहे, असे न्यायालयाने सुनावले. ( Mumbai High Court no changes in Accused punishment in Rape case-nss91)

हेही वाचा: बोगस लसीकरणाचे आरोपपत्र दाखल करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

अभियोग पक्षाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पिडीत महिलेच्या परिसरात राहणारा होता. ती देवळात गेली असताना त्याने तिला जत्रेत नेण्याचे आमीष दाखवले आणि घृणास्पद वर्तन केले. पिडित तरुणीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अपहरण आणि बलात्कार या आरोपात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले.

loading image