मुंबई उपनगर हाउसिंग फेडरेशन शिवसेनेकडे; अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर | Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Ghosalkar

मुंबई उपनगर हाउसिंग फेडरेशन शिवसेनेकडे; अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

मुंबई : मुंबई जिल्हा उपनगर सहकारी हाउसिंग फेडरेशनच्या (Mumbai housing federation) अध्यक्षपदी शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक व मुंबै बँकेचे संचालक (Mumbai bank director) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची नियुक्ती झाली आहे. फेडरेशनतर्फे उपनगरांमधील गृहनिर्माण संस्थांच्या (housing organization) समस्या सोडविल्या जातात. घोसाळकर हे सध्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबई बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. या घडामोडींमुळे उपनगरातील हाउसिंग फेडरेशनवर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीत सचिवपदी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे रमेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभू हे डीम्ड कन्व्हेयन्स कायद्यासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत. तर उपाध्यक्षपदी एडवोकेट समीर शिर्के यांची खजिनदारपदी कृष्णा बांबरकर तर संचालकपदी डॉ. सुरेंद्र मोरे, मनोहर काजरोळकर, एडवोकेट सुनील राणे, चंद्रकांत दुखंडे, शशिकांत मोरे, डॉ. मिहीर शहा, नंदकुमार वरणकर, दर्शना गोलतकर, प्रमोद शिंदे व विभूती पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान धोकादायक तसेच पुनर्वसन रखडलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत राहण्याचे वचन अभिषेक घोसाळकर यांनी यावेळी दिले. तसेच उपनगरातील गृहनिर्माण संस्था सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांचे डीम्ड कन्व्हेयन्स, उपविधी मधील दुरुस्ती आदींबाबत सभासदांना न्याय मिळवून देणार असल्याचेही ते म्हणाले.

गृहनिर्माण संस्थाचा कारभार अधिक पारदर्शक करून संस्थाच्या तक्रारींवर निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. लौकरच मुंबई उपनगर जिल्हा हाउसिंग टाईम्स हे मासिक सुरू करून सभासदांना गृहनिर्माण विषयी सविस्तर माहिती दिली जाणार असेही ते म्हणाले. याप्रसंगी म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजू शेट्ये शाखाप्रमुख सतीश परब उपस्थित होते.

loading image
go to top