मुंबईत आयसीयू बेड न मिळाल्याने क्षयग्रस्त महिलेचा मृत्यू

ICU bed
ICU bedSakal media

मुंबई : आयसीयू खाटा (ICU beds) उपलब्ध न झाल्याने एका ५० वर्षीय नॉन-कोविड टीबी रुग्णाला (TB patient) जीव गमवावा (woman death) लागला आहे. टीबी संसर्गजन्य असल्याचे सांगत रुग्णालयांनी या रुग्ण महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे समजते. महिलेला फुप्फुसाचा टीबी झाला होता. पूर्ण फुफ्फुस खराब (lung decease) झाले होते. त्यामुळे तिला आयसीयूची गरज होती. शिवडी टीबी रुग्णालयानेही (shivadi hospital) आयसीयू उपलब्ध नसल्याचे नातेवाइकांना सांगितले. फक्त कोविडसह टीबी असणाऱ्या रुग्णांवर इथे उपचार केले जात असल्याने नॉन-कोविड टीबी रुग्णांना पालिकेच्या (bmc) इतर रुग्णालयांत जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.

महिलेवर याआधी अंबरनाथ येथील रुग्णालयात आयसीयूमध्येच उपचार सुरू होते; पण तिथल्या डॉक्टरांनी केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. कार्डियाक रुग्णवाहिका करून महिलेला केईएम रुग्णालयात आणले. विचारपूस केली तेव्हा आयसीयूसह जनरल वॉर्डमध्येही खाटा उपलब्ध नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. बरीचशी खासगी रुग्णालये फिरल्यानंतर अखेर त्यांनी जेजे रुग्णालयात रात्री ८.३० वाजता नेण्याचा निर्णय घेतला. रात्री १० वाजता रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर एका वॉर्डमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सोय करून दिली; पण तोपर्यंत महिलेची प्रकृती बिघडली होती, असे महिलेच्या शेजाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. रविवारी पहाटे ५.३० वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जेजे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ICU bed
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास वादात छोटा शकीलच्या भावाची उडी ; गुन्हा दाखल

नेमके काय झाले ?

शेजारी जे या महिलेच्या आयसीयु बेड साठी फिरत होते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले आम्ही केईएमला गेलो. त्याआधी त्या अंबरनाथला एका रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत होती. तिथल्या डाॅक्टरांनी पुढचे उपचार आम्ही करू शकणार नाही आणि त्यांना केईएम मध्ये न्या असा सल्ला दिला.  मग त्यांना केईएमला आणलं पण, केईएम मध्ये आयसीयु तर सोडाच पण जनरल वॉर्ड मध्ये ही बेड उपलब्ध नव्हता. डॉक्टरांना रिपोर्ट वरूनच कळलं होत कि तिला आय सीयु आणि व्हेंटिलेटर लागू शकतो. त्या नंतर आम्ही खासगी रुग्णालयात गेलो. टीबीची लक्षणे असल्यामुळे आहेत त्यांनी दाखल करण्यास नकार दिला. कारण टीबी रुग्णासाठी त्यांना वेगळा आयसीयु बेड आणि वेगळी रूम लागणार होती म्हणून त्यांनी तिथे दाखल करुन घेतले नाही.

त्यांनी 3 ते 4 तास त्यांना ठेवले पण त्याचे ही 4 हजार रुपये घेतले. त्यानंतर, कार्डियाक रुग्णवाहिका घेऊन रुग्णासह दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात गेलो. तिथे म्हणाले कि टीबी रुग्णाला  आम्ही घेणार नाही त्यांच्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. एका जवळच्या व्यक्तीने शिवडी टीबी रुग्णालयाचा जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिवडी टीबी रुग्णालयात गेलो. तिथे चौकशी केली. तिथे आयसीयु बेड होता.पण, नाॅन कोविड रुग्णांसाठी नव्हता. 

ICU bed
फेरीवाल्यापासून ते सराईत गुन्हेगार ; रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्यानंतर नायर रुग्णालयाला गेलो. तिथे ही रुग्णाला घेण्यात आलं नाही. त्यानंतर जे जे रुग्णालयात गेलो त्यांच्याकडे बेड नव्हता पण, वॉर्ड मध्ये जागा उपलब्ध होती. तिथे त्यांना डॉक्टरांनी चेक केलं आणि तिथे त्यांना दाखल केलं आणि त्यांना ऑक्सिजन दिला तसेच व्हेंटिलेटर बेड च्या बाजूला आणून ठेवला होता. फक्त आयसीयु उपलब्ध नव्हता. पण बाकी पूर्ण सोय त्यांनी करून दिली. 10 वाजण्याच्या सुमारास रुग्णाला वॉर्ड मध्ये नेण्यात आलं. आणि सकाळी 5.30 ला डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलं.  त्यांच्या कुटुंबामध्ये या महिलेचे पती, 25 वर्षाचा मुलगा 16 वर्षाची मुलगी आणि त्यांचा एक दिव्यांग दिर आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाविषयी नातेवाइकांशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

सध्या नॉन कोविड टीबी रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध नाहीत. येत्या दोन महिन्यांत १० खाटांचे नॉन कोविड रुग्णांसाठी आयसीयू तयार होईल. याचे सध्या काम सुरू आहे. व्हेंटिलेटर आणि आयसीयू उपलब्ध नसून ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. गंभीर रुग्णांना केईएम आणि नायर रुग्णालयात पाठवले जाते.

- डॉ. नम्रता कौर, वैद्यकीय अधीक्षक, शिवडी टीबी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com