esakal | Coronavirus : दुसरी लाट मुंबईतील गरोदर महिलांसाठी अधिक धोकादायक; मृतांच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील गरोदर मातांना कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका

मुंबईतील गरोदर मातांना कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त घातक आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये मृत्यूदराचं प्रमाण वाढलं असून त्यात गरोदर स्त्रियांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये गरोदर स्त्रियांचं आयसीयूमध्ये दाखल होण्याचं प्रमाण व मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळेच प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे, असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसंच कोविडची दुसरी लाट गरोदर स्त्रियांसाठी जास्त धोकादायक असल्याचंही म्हटलं जात आहे. (mumbai-in-2nd-wave-covid-death-among-pregnant-women-rose-8-fold)

मुंबईतील नायर रुग्णालय व ICMR यांनी केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या काही काळात प्रेग्नंट महिलांचा मृत्यूदर 8 टक्क्यांनी वाढला आहे. तर गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या 5 पटीने वाढली आहे. याविषयी अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनाकॉलॉजिस्टमध्येदेखील नमूद करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूदराचं प्रमाण 07% टक्के होते. या दरात 2021 मध्ये वाढ झाली असून ती 5.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तसंच गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. पहिल्या लाटेत गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1.7% होते. ती 2021 मध्य 8.5 %झाली आहे. 2020 मध्ये कोविड पॉझिटिव्ह गर्भवती स्त्रियांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचं प्रमाण 2.4 % होतं. हेच प्रमाण 2021 मध्ये वाढून ते 12 टक्क्यांपर्यंत पोहोचलं.

एप्रिल २०२० मध्ये नायर रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह महिलांवर सर्वाधिक उपचार करण्यात आले. मात्र, एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत ही आकडेवारी वाढली असून त्यात १ हजार ५३० रुग्णांचा समावेश झाल्याचं पाहायला मिळालं.

loading image