Mumbai : केडीएमसी राज्यात दुसरी, 'क' वर्ग महापालिकांमध्ये शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत मिळवले यश

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कल्याण डोंबिवली नगरीत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात
Eknath Shinde
Eknath Shindesakal

डोंबिवली : राज्यातील शहरे स्वच्छ व सुंदर दिसावी या संकल्पनेतून शासनाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये एक शासन निर्णय पारित केला होता. त्याअंतर्गत राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 राबविण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही या स्पर्धेत सहभाग घेत पालिका

हद्दीत कायापालट अभियान राबविले. त्याअंतर्गत जलाशय स्वच्छता, सुंदर हिरवे पट्टे, सुंदर पर्यटन स्थळ, वारसा स्थळ यांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. पालिकेने राबविलेल्या उपक्रमांमुळे पालिका प्रशासनाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कल्याण डोंबिवली नगरीत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली महापालिकेने शहरातील रस्ते व त्यामधील वाहतुक बेटे यांचे सौंदर्यीकरण केले. शहरातील विविध शाळा, सरकारी कार्यालये, निवास स्थाने, खाजगी मिळकतींच्या वाडेभिंतींवर जे.जे.कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यां मार्फत सुंदर चित्रे रंगवून या भिंतीचे रुपडे नेत्रसुखद केले.

शहराचा सांस्कृतिक वारसा जपतानाच महापालिका शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नववर्ष दिनी "गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा" ही संकल्पना गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यास सुरुवात केली. आंबिवली येथील उजाड टेकडीवर 15 हजार पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन या टेकडीचे एका निसर्गरम्य स्थळात ऑक्सीजन झोन मध्ये रुपांतर केले. कल्याण मधील सर्वात जुना शेनाळे तलाव, प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे संपूर्ण कायापालट करुन सुशोभिकरण करण्यात आले.

खाडीकिनारी ठिकठिकाणी असलेल्या दगडांवर मनोहारी चित्रे रेखाटण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील इतर तलावांचे देखील सुशोभिकरण करण्यात येत आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीकोनातून स्मार्ट सिटी मार्फत उल्हास नदी किना-या लगत नौदल गॅलरीसह अडीच कि.मी. लांबीचा रिव्हर फ्रंट विकसीत करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे कल्याण खाडी किनारी गणेश घाट येथे भारतीय नौदलामार्फत प्राप्त झालेली युध्द नौका नागरीकांच्या माहितीसाठी ठेवण्यात आली आहे. रस्ते दुभाजकांवरील रंगरंगोटी हरित पट्टयांचा विकास याप्रमाणे कल्याण डोंबिवली नगरीचा कायापालट पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

या कामांची पोचपावती म्हणून शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये शासनाच्या समितीने क वर्ग महानगरपालिका गटामध्ये केडीएमसीस दुस-या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, सचिव संजय जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com