
मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त विशेष गाडी चालविणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त विशेष गाडी चालविणार आहे. गाडी क्रमांक 01411 विशेष गाडी 2 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 8.20 वाजता सुटेल. ही गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूरला दुसर्या दिवशी सकाळी 7.20 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01412 विशेष गाडी 1 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दररोज रात्री 8.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी सकाळी 7.25 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, कर्जत, खंडाळा (केवळ 01412 साठी), पुणे, सातारा, कराड, ताकारी, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथे थांबा देण्यात येणार आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
या गाडीची संरचना एक द्वितीय वातानुकूलित डबा, दोन तृतीय वातानुकूलित डबे, 10 शयनयान आणि 5 द्वितीय आसन श्रेणी अशी असणार आहे.
या गाडीचे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्रमांक 01411/01412 चे सर्वसाधारण शुल्कासह बुकिंग 25 जानेवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल,असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Mumbai Kolhapur Special Train will run daily central railway marathi news
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )