Mumbai : कोल्हापुरच्या एआरटीओकडूनच शासनाची फसवणुक,वाहन नोंदणीक्रमांकात खोडतोड करून दुसऱ्या वाहन क्रमांकाचा वापर

मुंबईत वाहतुक अतिरीक्त पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल
Mumbai news
Mumbai newsesakal

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याची म्हण यापुर्वी आपण सर्वांनी ऐकली असेल. मात्र, अशी घटना कोल्हापुरात घडल्याचे पुढे आले आहे. मुंबईत वाहतुक अतिरीक्त पोलीस महासंचलाकडे घटनेची तक्रार केली आहे. कोल्हापुर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एआरटीओ अधिकारी वापरत असलेल्या डस्टर वाहनाच्या नोंदणीक्रमांकात त्यांनी खोडतोड करून आॅडी वाहनाचा क्रमांक वापर केला असून, डस्टर वाहनांच्या वाहतुकीच्या ई-चलान आॅडी वाहनाच्या मालकावर आर्थिक भुर्दंड बसल्याचा आरोप तक्रारकर्ते तौसिफ शेख यांनी केला आहे.

Mumbai news
Parenting Tips : डॉ.एपीजे अब्दुल कलामांनी पालकांना दिलेला लाखमोलाचा सल्ला,पालकांनी घ्यावी विशेष काळजी

शेख यांनी स्थानिक वाहतुक पोलीस विभागाकडे यापुर्वी तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेख यांनी वाहतुक अतिरीक्त पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने स्थानिक वाहतुक विभागाला तक्रारीची दखल घ्यावी लागली आहे. त्यावरून शेख यांची ७ डिसेंबर रोजी जवाब नोंदवण्यात आला असून, तक्रारीच्या अनुषंगाने वाहतुक पोलीस विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप तक्रारदार शेख यांनी केला आहे.

Mumbai news
Baby Care Tips: बाळाची नखं कापताना लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही अडचण

कोल्हापूर आरटीओ कार्यालयात गेलो असता, डस्टर वाहन क्रमांक एमएच ०३ डिए १८८८ या वाहन क्रमांकामध्ये खोडतोड दिसून आली. ज्यामध्ये वाहनाच्या पुढच्या बाजुने वाहन क्रमांकातील १ अंकाला झाकून ठेवण्यात आले होते. त्यामूळे वाहन क्रमांक वाचतांना एमएच ०३ डिए ८८८ दिसून येत होता. परिणामी वाहनाची ओळख लपवण्यामागे नेमका हेतू काय ? वाहन क्रमांक बदलून कोणताही गुन्हा घडल्यास पोलीस तपास करतांना अडचणी येतील. त्यामूळे एमएच ०३ डिए १८८८ या क्रमांकाच्या वाहनाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी वाहतुक अतिरीक्त पोलीस महासंचालकांकडे केली असल्याचे तौसिफ़ खलील शेख यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले आहे.

Mumbai news
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

डस्टर वाहन क्रमांकाची ईचलान आॅडी वाहन मालकाला

एमएच ०३ डिए १८८८ या वाहनधारकाने वाहन क्रमांकातील १ अंक झाकुन ठेवल्याने, वाहन वेगाने चालवण्याच्या गुन्हाची ईचलान एमएच ०३ डिए ८८८ या नोंदणी क्रमांकाची आॅडी वाहन मालकाला देण्यात आली. धक्कादायक म्हणजे, खुद्द आॅडी मालकाला सुद्धा अद्याप याची माहिती नसून कोल्हापुर येथील शेख यांनी याप्रकरणात सखोल माहिती घेतल्यानंतर प्रकरण उघड झाले आहे.

Mumbai news
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

आतापर्यंत चार ईचान

शेख यांनी एमएच ०३ डिए ८८८ या वाहन क्रमांकाची माहिती पाहिली असता आॅडी कंपनीचे वाहन निधी मल्होत्रा नावाने नोंदणीकृत आहे. कलम ११२/१८३ (१) एमव्हिए नुसार वाहनावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी चार चलान एमएच ०३ डिए १८८८ या वाहनधारकाने आपले वाहन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालविल्याने चार हजार रूपये भुर्दड आॅडी मालकाला भरावा लागला आहे

Mumbai news
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

गेल्या तिन-चार वर्षांपासून एमएच ०३ डिए १८८८ या वाहन क्रमांकामध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केली आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. ११ सप्टेंबर रोजी तक्रार केली असून, अद्याप ठोस कोणतीही कारवाई केली नाही. त्यामूळे संबंधीत वाहन ताब्यात घेऊन वाहनमालकाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा.

- तौसिफ़ खलील शेख, तक्रारदार

हेतुपूरस्पर ही तक्रार केली आहे. याप्रकणात केलेली तक्रार जुनीच आहे. त्यावर उत्तर सुद्धा दिले होते. त्यामूळे यासंदर्भात अधिक माहिती घेऊन आपल्याला माहिती देतो.

- विजय इंगवले, एआरटीओ, कोल्हापुर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com