मुंबई, कोकणात तीन-चार तासांत जोरदार वाऱ्यांसह बरसणार पाऊस - IMD

मुंबईकरांना पुढील काही तास मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
weather update rain forecast heavy rain in Vidarbha
weather update rain forecast heavy rain in Vidarbhasakal
Updated on

मुंबईसह कोकण विभागातील जिल्ह्यांना येत्या तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे. (Mumbai Konkan to receive intense rain with gusty winds in 3 to 4 hours IMD)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी ४० ते ५० किमी वेगानं वारे वाहतील. त्याचबरोबर या भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातही वाढला पावसाचा जोर

दरम्यान, पुणे शहरातील पावसाचा जोर मंगळवारीही (ता.९) कायम राहणार असून, बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यमस्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच याच काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारी घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून, या काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नसे अशी सूचनाही हवामान विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com