Mumbai Kurla Fire: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग, बचावकार्य सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

Mumbai Kurla Fire: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग, बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईतल्या कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

(Mumbai Kurla Building Fire Accident Latest News)

दरम्यान, कुर्ला येथील नवीन टिळक परिसर भागातील एका इमारतीच्या १० ते ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग भीषण असून या इमारतीतून धुराचे लोट येत आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर इमारतीतील इतर लोकांना बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा: Shivsena: धनुष्यबाण कुणाला मिळणार? ठाकरे गटाचा 800 पानांचा रिप्लाय सादर

अग्निशामक दलाचे जवान घटनास्खळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरू असल्याचं सांगण्यात येतंय पण इमारतीतील नागरिकांना बाहेर कसं काढले जाणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर घरात किती लोकं अडकले आहेत यासंदर्भात माहिती समोर आली नसून काहीजण खिडकीत बसलेले आहेत.

टॅग्स :Mumbai Newsfire