
Mumbai Local News: कर्नाक पुलावरील गर्डर उभारणीच्या कामामुळे प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या हार्बर मार्गावर रेल्वेसेवा विस्कळीत झाली. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचून ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होणे अशक्य झाले. मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष पॉवर ब्लॉकमुळे प्रवाशांच्या योजनांवर पाणी फिरले.