
ट्रान्स-हार्बर रेल्वेवर रेल्वेतर्फे नुकताच 42 तासांचा मोठा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. यावेळी बेलापूर ते पनवेल दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी झालेला त्रास हा लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना क्षणिक वाटत होता.
मात्र आता आठवडा होत आला तरी लोकल वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
याचे कारण म्हणजे ट्रान्स हार्बर मार्गावर ठाण्याहून केवळ बेलापूर पर्यंतच लोकल घावत आहेत. पुढे पनवेल पर्यंत लोकल जात नाहीयेत. यामुळे ठाण्याहून बेलापूरला प्रवास करत असलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
पुढील सूचना मिळेपर्यंत ठाणे पनवेल लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.ठाण्याहून केवळ बेलापूर पर्यंत लोकल धावत आहेत.
पनवेल येथे यार्ड रीमॉडेलिंगचे काम सुरू आहे. यामुळे ही लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अकरा वाजेपर्यंत बेलापूर ते पनवेल लोकल धावणार नाहीत असे म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.